प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; आयकर धारक व अपात्र लाभार्थ्याना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नका आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी








प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; आयकर धारक व अपात्र लाभार्थ्याना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नका
                                                       - आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी 


पनवेल(प्रतिनिधी) प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत आयकर धारक व अपात्र लाभार्थ्याना वाटप केलेल्या निधीची वसुली करू नये, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे केली आहे. 



         या संदर्भात त्यांनी पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत किसान लाभार्थ्यांना निधी वाटप केला जातो. तथापि सदर योजनेच्या निकषामध्ये बसत नसलेल्या व आयकर विवरण भरलेल्या किसान लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांचेकडून वितरित निधीची वसुली करण्याच्या सुचना देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शेतीसाठी कर्ज काढणे, शेतीपुरक योजनांचा लाभ घेण्यासाठी, तांत्रिक बाबी पूर्ण करण्याकरीता, शेतकरी काही वेळा जरी ते आयकर भरण्यास पात्र ठरत नसूनही 'शून्य' विवरण पत्र भरीत असतात.




 सदर योजनेच्या पोर्टलवर मात्र संबंधित शेतकऱ्याने आयकर विवरण पत्र भरले असे गृहीत धरून लाभार्थीस निकषानुसार अपात्र ठरविले जाते. त्यामुळे ही तांत्रिक बाब पडताळून योजनेच्या निकषामध्ये बदल करण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सरकारच्या योजना हया शेतकऱ्यांच्या, ज्यामध्ये बहुतांशी ज्येष्ठाचा समावेश आहे. लाभ मिळण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे घालावे लागू नये या दृष्टीनेही उपाययोजना कराव्यात, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून अधोरेखित केले आहे. 



थोडे नवीन जरा जुने