पनवेल दि.०३ (वार्ताहर) : तालुक्यातील तोंडरे गाव परिसरातून तळोजा पोलिसांनी एका व्यक्तीकडून जवळपास 95 हजार 230 रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ हस्तगत केला असून त्याच्या विरोधात एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8(3), 20 (ब) प्रमाणे कारवाई केली आहे.
विकास मोतीराम पाटील (31, रा.तोंडरे गाव) हा त्याच्या ताब्यातील होंडा अॅक्टीव्हा गाडीवरुन गांजा हा अंमली पदार्थ घेवून जात असल्याची माहिती तळोजा पोलिसांना मिळताच वपोनि जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, अनंत लांब व पथकाने त्याला सचिन हॉटेल मेन रोडवर अडवून त्याच्याकडून जवळपास 95 हजार रुपये किंमतीचा 4 किलो वजनाचा गांजा व इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Tags
पनवेल