उरण दि.२६(विठ्ठल ममताबादे )
पनवेल तालुक्यातील वहाळ येथील सामाजिक कार्यकर्ते वै. स्व.धनाजी काथोर पाटील यांचा २५/१०/२०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरी वहाळ येथे द्वितीय पुण्यसमरण दिन पाटील कुटुंबियांमार्फत साजरा करण्यात आला. सकाळी ८ ते ९ प्रतिमा पूजन, सकाळी १० ते १२ हभप संतोष महाराज बढेकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन, दुपारी १२ नंतर महाप्रसाद असे
विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मनमिळाऊ प्रेमळ स्वभाव, दांडगा जनसंपर्क असल्याने धनाजी काथोर पाटील यांना मानणारा खूप मोठा वर्ग उरण पनवेल तालुक्यात आहे. स्व. धनाजी काथोर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच त्यांचे विचार व कार्य सर्वत्र निरंतर प्रचलित राहावेत, त्यांच्या विचारांचे कार्याचे अनुसरण व्हावे या दृष्टीकोणातून वै. स्व. धनाजी काथोर पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यांनी वै.स्व.धनाजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.
Tags
उरण