वहाळमध्ये पर्यावरणपूरक दसरा गणेशोत्सव उत्साहात साजरा.







वहाळमध्ये पर्यावरणपूरक दसरा गणेशोत्सव उत्साहात साजरा.


उरण दि २६ (विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यात दसरा सणाच्या दिवशी अनेक ठिकाणी दसरा गणेशोत्सव साजरे करतात. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गणेशमूर्ती विराजमान होते. ही प्रथा अनेक वर्षापासून कोकणातील जिल्हयात सुरु आहे. अशीच परंपरा पनवेल तालुक्यातील वहाळ गावात पाटील बंधू व मित्र परिवार वहाळ यांच्या तर्फे गेली १६ वर्षे अविरतपणे सुरू आहे. यंदाचे दसरा गणेशोत्सवाचे हे १७ वे वर्ष आहे.



 पाटील परिवार व वहाळ मित्रपरिवार च्या वतीने सुंदर अशी गणेशमूर्ती बसविण्यात आली आहे.या ठिकाणी दररोज आरती,महाप्रसाद, सामुदायिक हरिपाठ व भजन असे धार्मिक य कार्यक्रम पार पडले. गणेशोत्सवामध्ये गणेश मूर्तीच्या आजू बाजूला आकर्षक अशी विदयुत रोषणाई करण्यात आली होती. तसेच प‌र्यावरण पुरक अशा नैसर्गिक साहित्यांचा वापर करण्यात आला होता . साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील याच्या संकल्पनेतून दरवर्षी वहाळ गावात दसरा गणेशोत्सव साजरा केला जाते. रवीशेठ पाटील,अरुण दापोलकर, बाळाराम पाटील तसेच पाटील बंधू व मित्र परिवार वहाळ दसरा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील,मंडळाचे उपाध्यक्ष संदिप पाटील,सचिव सुनील पाटील, खजिनदार - रणधिर पाटील,सदस्य राजेंद्र पाटील, सुधीर पाटील, रणजित पाटील, संगीत पाटील, सुशील पाटील, प्रशांत पाटील, आदी ४० हुन अधिक मंडळाचे सदस्य यांनी दसरा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.दिनांक २४/१०/२०२३ रोजी विराजमान झालेल्या गणेशमूर्तीची गुरुवार दिनांक २६/१०/२०२३ रोजी मोठया थाटामाटात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.


थोडे नवीन जरा जुने