महिला बेपत्ता



पनवेल दि.०२ (वार्ताहर) : तालुक्यातील पाले बुद्रुक गावामध्ये राहणारी विवाहित महिला पनवेल शहरामध्ये जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली मात्र परत घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

 
  काजल तेजस तांडेल (वय २६) असे या महिलेचे नाव असून तिची उंची ५ फूट, रंग-गोरा, केस लांब, डोळे-काळे असून अंगात पिवळ्या रंगाचा - वनपिस ड्रेस तसेच पायात चप्पल घातलेली आहे. सदर महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्र.२७४६४३३३ किंवा पोलीस हवालदार मंगेश भूमकर यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने