पनवेल दि.२३(संजय कदम) : हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले.
यामध्ये सुकापुर विचुंबे येथे सामाजिक उपक्रम राबवित नागरिकांना मोफत ब्लंकेट, लहान मुलांना फळे व वह्या वाटप करण्यात आल्या. नवीन पनवेल येथे शहर प्रमुख यतीन देशमुख यांच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकांसाठी तसेच आपोलो हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य शिबीर जेष्ठ नागरिक हॉल सेक्टर-०२ नवीन पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. तसेच मोफत शिबीराच्या माध्यमातून रक्तदाब तपासणी, रक्त शुगर तपासणी, हाडांची तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, हाडांची तपासणी, डोळे तपासणी आणि दातांची तपासणीसाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
तसेच स्व. नाथाभाई मढवी क्रिकेट क्लब तळोजा मजकूर (भोईरपाडा) आयोजित वंदनिय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृति चषक आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख यतीन देशमुख, प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, महिला शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू, विभाग प्रमुख ग्रामीण विशाल भोईर, किरण सोनवणे, जयंत पाखरे, मालती पिंगला, ज्योति पाटील, शारदा पाटील, आदि पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल