पनवेल दि. २८ ( वार्ताहर ) : रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचं नुकतेच मुंबई इथे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्याबद्दल रायगड जिल्हा स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
सुमंतराव गायकवाड यांनी १९६० ते ६७ अशी सात वर्षे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आरपीआय आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सलग पंधरा वर्षं त्यांनी काम केलं होतं. ते आठ वर्ष आमदार होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी होते. महाराष्ट्रभर संघटना वाढीसाठी त्यांनी अतिशय मेहनत घेतली होती. याबद्दल स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी त्यांना रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Tags
पनवेल