पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा



पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष जयंत पगडे, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, 


माजी नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, माजी नगरसेविका सुशिला घरत, तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने