कृष्ण चरित्र व्यक्तीला पावलो पावली जगायला शिकवितो - ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील







काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २५ फेब्रुवारी, जीवनातील आयुष्य हे जणू खेळाशी निगडित आहे.क्रिकेटचा निर्माता हा श्री कृष्णच आहे.त्याच प्रमाणे मातीचे कणाकणांचे महत्व काय ?मातीच्या संपर्कात कोणतेही वस्तू आल्यास त्यांची माती होते.मात्र सोनं हे तसेच राहते.छत्रपती शिवाजी महाराज यांनी कृष्ण नीतीचा वापर करून जीवनात सघटना,सहनशीलता अनेक वेळा वापर केला.यामुळे जीवनांत कृष्ण चरित्र व्यक्तीला पावलो पावली जगायला शिकवितो असे मत ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील आंबिवली येथील काल्याच्या कीर्तनात व्यक्त केले 



                       काल दीपोत्सव च्या माध्यमातून या अखंड हरिनामाची सांगता करण्यात आली.यावेळी ह.भ.प.मारुती ( दादा ) महाराज राणे ( रायगड मित्र पुरस्कृत )हालिवली कर्जत,दिलीप महाराज राणे,रमेश महाराज पाटील,तसेच सरपंच,सदस्य,महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.त्याच बरोबर काल्याचा महाप्रसाद ग्रामस्थ मंडळ आंबिवली यांच्या माध्यमातून देण्यात आली.



                   यावेळी भाई महाराज म्हणाले की कालयवन यांनी श्री कृष्णांवर १७ वेळा स्वारी केली मात्र सहनशिलता आणि चातुर्य वापरून त्यांस ठार मारले.जीवनात निवडला खूप महत्व आहे.त्याच बरॊबर आजचे तरुण वर्ग लहान मुले मोबाईल मध्ये व्यस्त झाले आहे.मात्र श्री कृष्ण सकाळी घोंगडी खाद्यांवर घेवून जंगलात गुरे चरण्यासाठी घेवून जात असे.मात्र आज सायंकाळी सात वाजता मालिका सुरु होते रात्री अकरा वाजेपर्यंत केवळ सासू सुना विषयी जास्त दाखविले जाते.



              प्रत्येकाचे अन्न ठरवून दिले आहे.कारण जो जन्माला घालतो तो प्रत्येकाला अन्न देतोच,मात्र माणसांचा मूळ स्वभाव हो खोडसाळ झाला आहे.शासनाने अन्न मोफत दिले आहे मात्र समाधान हा काही गुण कमी होत नाही.जीवनात संगत घडविते बिघडविते,आज पैसे सर्वत्र मानले जाते.मात्र भगवंताचे नामच सर्वस्व आहे.श्री कृष्ण यांस चौदा विद्या चौसष्ठ कला प्राप्त होत्या मात्र आज अनेकांचे हरिपाठ पाठ नाही ही शोकांतिका आहे.असे मत काल्याच्या कीर्तनात ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील यांनी व्यक्त केले  




थोडे नवीन जरा जुने