त्र्यंबकेश्वराहून निघालेली बस उलटली पण....
नाशिकच्या त्रंबकेश्वर दर्शन घेऊन गुजरातकडे जाणाऱ्या खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून, त्यामध्ये 30 हुन अधिक प्रवासी हे जखमी झाले आहेत. तर दहा जणांची परिस्थिती गंभीर आहे


. नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून, गुजरातहून त्रंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी हे भाविक आले होते. हरसुल मार्गे गुजरातची वाट त्यांनी धरली असतानाच, घाटात चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही.


थोडे नवीन जरा जुने