डॉ. रूपाली तरंगे यांचे शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख व रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी केले अभिनंदन
पनवेल दि.२६ (संजय कदम) : डॉ. रूपाली अरूण तरंगे हिने एमडी मेडिसिन परिक्षेत नाशिक युनिवर्सिटी मधून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवून कळंबोलीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्या बद्दल शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख व रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी तिचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 


रामदास शेवाळे प्रतिष्ठान चे सल्लागार व वाहतुक व्यवसायिक अरूण तरंगे यांची कन्या डॉ. रूपाली अरूण तरंगे हिने नाशिक युनिवर्सिटीच्या एमडी मेडिसिन परिक्षेतमधून महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवला आहे. याबद्दल शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख व रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी तिच्या घरी जाऊन अभिनंदन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आबासाहेब लकडे, बालाजी खोडेवाड, विजय जाधव, निलेश डिसले, श्रीकांत फाळके व प्रतिष्ठान मधील कार्यकर्ते उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने