रायझिंग पनवेल स्ट्रायकर्स ठरला कॅप क्लबच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा विजेता

पनवेल दि.१८ (वार्ताहर) : पनवेल शहरातील नामांकित मल्टी स्पोर्ट टर्फ असलेले कॅप क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2023’ चा रायझिंग पनवेल स्ट्रायकर्स विजेता ठरला आहे. ऍड मनोहर सचदेव आणि मनोज देधिया यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.  पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीमध्ये लोकप्रिय व तरुणांच्या पसंतीच्या कॅप क्लबच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2023’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, करंजाडे विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये १४ संघांनी सहभाग घेतला. रायझिंग पनवेल स्ट्रायकर्स ने स्पर्धचे विजेतेपद पटकावले तर प्रो टीमने दुसरे तसेच बीके चॅलेंजर्स संघाने तिसरे पारितोषिक मिळवले.  
थोडे नवीन जरा जुने