स्मृती चषक,माजगांव आंबिवली आयोजित, स्पर्धेत तळवळी संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ,तर द्वितीय क्रमांकाचे ठरले तळेगाव संघ







काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा : २० मार्च , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्रुप ग्राम पंचायत माजगांव आयोजित स्मृती चषकाचे आयोजन माजी प.स.खालापूर सदस्य - आत्माराम शंकर पाटील यांच्या माध्यमातून माजगांव - आंबिवली येथिल पीपीयल कंपनीच्या समोर करण्यात आले होते. या झालेल्या नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेत या परिसरातील संघांनी सहभाग नोंदविला होता. प्रथम क्रमांक तळवळी या संघाने पटकावले.तर व्दितीय क्रमांक तळेगांव संघ यांनी पटकावले,तृतीय क्रमांक बारवई संघ, चतुर्थे क्रमांक गावडे जांभिवली या संघाने पटकाविले ( ,या स्पर्धेत या परिसरातील ३२ नामांकित संघांनी सहभाग घेतला.



 या क्रिकेट चे समावोलोचन,प्रकाश पाटील,अशोक मालकर,संतोष चौधरी,टी.के.माळी,अंजिक्य भऊड,पॅडी ( पंढरीनाथ ) पवार अदि ने केले. या सामन्यात अंतिम विजेत्यास प्रथम क्रमांक १, लाख रुपये,द्वितीय क्रमांक ५०, हजार तर तृतीया क्रमांक यांस २५,हजार रुपये तसेच,चतुर्थ क्रमांक २५ हजार ,भव्य चषक आणी देण्यात आले.या स्पर्धेचा अंतिम सामन्यात तळेगांव संघाचा पराभव करून तळवळी संघाने प्रथम क्रमांक पटकावले.विजेत्या संघास आकर्षक चषक,द्वितीय,तृतीय,चतुर्थ क्रमांक आकर्षक चषक,देण्यात आले. या क्रिकेट सामन्याचे आयोजन शिवसैनिकांनी या परिसरातील क्रिडा प्रेमीसाठी स्मृती चषक यांच्या माध्यमातून भरविण्यात आले होते. 




या स्पर्धेतील क्षेत्ररक्षक - किरण गावडे ( जांभिवली ) तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ओंमकार गावडे, ) तसेच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अभिजित कडपे - तळेगांव संघ,तसेच मॅन ऑफ द सिरीज - समीर मालकर - ( तळवळी संघ ) सायकल आणी चषक मिळाले या यक्तिक बक्षीस रोख रक्कम स्वरूपात मिळाले. प्रथम क्रंमांक चषक - कै.मधुकर जाधव यांच्या स्मरणार्थ - रुपेश जाधव,द्वितीय क्रंमांक चषक - कै. गजानन दुंधा ढवाळकर यांच्या स्मरणार्थ - शशिकांत ढवाळकर यांच्या माध्यमातून,तृतीय क्रंमांक चषक - कै.हरिचंद्र नथू ढवाळकर यांच्या स्मरणार्थ - बाजीराव ढवाळकर यांच्या माध्यमातून,चतुर्थ क्रंमांक चषक - कै.राम बेंडू लभडे यांच्या स्मरणार्थ मंगेश लभडे यांच्या माध्यमातून देण्यात आले.



 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनोहर शेठ भोईर,उप जिल्हा प्रमुख - नितीन सावंत,सह संपर्क प्रमुख - भाई शिंदे,तालुका प्रमुख - एकनाथ पिंगळे ,युवा सेना अधिकारी - महेश पाटील,मोतीराम ठोबरे,श्याम भाई साळवी,त्याच समवेत माजी सरपंच माजगांव रुपेश जाधव - माजी उप सरपंच राजेश पाटील मंगेश पाटील,अमित पाटील,दीपक मालुसरे,तसेच रवी पाटील,मच्छिंद्र जाधव,उद्योजक - राजेश जाधव,प्रकाश ( बंधू ) जाधव,माजगांव,आंबिवली,वारद,पौध,शाखा प्रमुख,उप शाखा प्रमुख,युवा सेना अधिकारी,सर्व पदाधिकारी जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते. अदि संघटनेच्या माध्यमातून हा क्रिकेट सामन्यांचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच या स्मृती चषक सामान्यांचे थेट प्रक्षपण क्रिडा प्रेमी यांस पहतायावे या उद्दात विचारांतून( युट्युब ) मंगेश पाटील,यशवंत शिंदे,मारुती ढवाळकर यांच्या माध्यमातून करण्यात आली.



थोडे नवीन जरा जुने