अवकाळी पावसामुळे आंब्यांच्या च्या बरोबर जंगलाचा रानमेवा संकटात ; अदिवासीयांच्या उपजिविकेवर प्रश्नचिन्ह


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा,१७ मार्च,अवकाळी पावसाने तालुक्याच्या ठीकाणी हजेरी लावली असल्यामुळे ,रस्ते जलमय झाले होते.तर हिवाळा हा ॠतू संपून उन्हाळा ॠतू ची चाहूल लागताच जंगलातील रानमेवा तयार होत असताना या अवकाळी पावसाचा फटका अदिवासी समाज्यांना बसला आहे. याच रानमेवा वर अदिवासी समाज्यांचे उपजिविकेचे साधन,निर्माण झाले होते.मात्र अवकाळी पावसामुळे त्यांच्या उपजिविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.                  तसेच ग्रामीण भागात शेतातील कडधान्य काढणीला,पावसाने अवेळी धिंगाणा घातल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गांकडून व्यक्त होत आहे.आंब्यांची मोठी हानी झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.सध्या आंब्यांना छोट्या कैर्‍या लागायला सुरू झाल्यानंतर वादळी वारे आणि या पावसामुळे कै-या खाली पडून खच निर्माण झाले आहे. त्याच बरोबर जंगलातील तयार होत असलेला रानमेवा मोठ्या संकटात सापडला आहे.


                डोंगरांची असलेली काळी मैना आता तयार होत असल्यांने अवकाळी पावसाने अदिवासी उपजिविकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तालुक्यात ठीकाणी कुठे रिमझीम झाली तर कुठे मुसळधार पावासांने चांगलेच झोडपले होते.वातावरणात उष्णता खुप वाढली असल्यामुळे उकाड्याची तीव्रता चांगलीच वाढली होती.मात्र अवकाळी पावासाने जरी वातावरणात गारवा निर्माण केला असला तरी सुद्धा शेतकरी चांगलाच धास्तावला आहे .यामुळे तोंडाशी आलेले पिक वाया जाण्यांच्या मार्गावर असताना शेतकरी पुर्ण हवाळदिन झाला


थोडे नवीन जरा जुने