श्री. गुरुनाथ म्हात्रे यानी खारघर येथे आयोजित केलेल्या "आधार कार्ड" मोहीमेला उतस्पूर्त प्रतिसादखारघर (प्रतिनिधि): काल दि.१८ मार्च रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत साई मंदिर से ३० येथे श्री. गुरुनाथ म्हात्रे यांनी आई सेवा सामाजिक संस्था, खारघर, ता. पनवेल, जि. रायगड आंणि आई सेवाभावी सामाजिक संस्था, ख़ारघर यांच्या सयुंक्त विध्यमाने आयोजित केलेल्या "आधार कार्ड" मोहीमेचा लाभ जवळजवळ २५० हुन अधिक नागरीकांनी लाभ घेतला. 

त्या सोबतच मतदार आयडीसाठी आधार दुरुस्ती, स्मार्ट कार्ड आणि वॉरंटी, मतदार कार्ड नोंदणी आणि आधार कार्ड लिंक,

सरकारच्या नव्या नियमानुसार ३१ मार्च २०२३ पूर्वी आधारकार्ड ला पैनकार्ड लिंक न केल्यास १२००० रूपये दंड़ टाळण्यासाठी 

आधारकार्ड ला पैनकार्ड लिंक करण्यासारख्या सुविधाही उपलब्ध होत्या.  


महत्वाचे म्हणजे या कार्यक्रमात, गरिबांना वरदान ठरलेल्या विशेष अर्थसहाय्य योजनाच्या निकष व अटी समजावून खालील उपक्रमाचा लाभ मिळवून देण्यात आला. 

१) संजय गांधी निराधार अनुदान उपक्रम

२) श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन उपक्रम

३) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन उपक्रम

४) इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन उपक्रम

५) इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना

६) राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना
हा कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी हलीमा तबरेज़ कुरेशी - अध्यक्ष आई सेवा सामाजिक संस्था, खारघर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कठीण परिश्रमांचे उपस्थितांनी तोड़भर कौतुक केले.


थोडे नवीन जरा जुने