गुढीपाडव्या निमित्त कोप्रोलीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
उरण दि 19 (विठ्ठल ममताबादे) ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली (उरण) व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार दि 21 मार्च 2023 ते बुधवार दि 22 मार्च 2023 रोजी श्री साईबाबांचे साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायण महापूजा व साई भंडा-यांचे आयोजन उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील गणेश मंदिर येथे करण्यात आले आहे.श्री साई चरित्रपारायण वाचन, मध्यान्ह आरती, धूप आरती, शिवचरित्र व्याख्यान, कीर्तन, भजन, लोकगीत, भावगीत,महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम गुढीपाडवा निमित्त कोप्रोली येथे आयोजित करण्यात आले आहे.ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ क्रोप्रोली व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आयोजित दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यात सहभागी होऊन नागरिकांनी, साई भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने