कामोठ्यात रंगणार ‘आमदार केसरी’ च्या माध्यमातून कुस्तीची दंगल







पनवेल दि.१४ (संजय कदम) : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान कुस्ती संघ, कामोठे च्या माध्यमातुन कामोठे मध्ये रविवार १९ मार्च रोजी ‘आमदार केसरी २०२३’ चा थरार रंगणार आहे. या कुस्तीमधील विजेत्या पैलवानाला १ लाख २१ हजारांचे पहिले इनाम मिळणार आहे.



कुस्तीचा प्रचार आणि प्रसार हे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्थापित केलेल्या जय हनुमान कुस्ती संघाच्या माध्यमातून कामोठे पोलीस स्टेशन समोरिल मैदानात हि कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास घरत आणि भाजप युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कुस्त्यांचे सामने आयोजित केले असून या वेळी पै.वैभव माने व पं. सुबोध पाटील तसेच पै. नवीन कुमार व पै. तानाजी विरकर या नामवंत मल्लांमध्ये लढती होणार आहे. या भव्य कुस्ती स्पर्धेचे उदघाटन रविवार १९ मार्च रोजी दुपारी २ वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. 


या स्पर्धेत विजेत्या पैलवानाला पहिले इनाम १ लाख २१ हजार चे बक्षीस मिळणार आहे. तसेच दुसरे इनाम १ लाख ११ हजार, तिसरे इनाम ८० हजार, चौथे व पाचवे इनाम प्रत्येकी ६० हजार व ४० हजार इतके आहे. या स्पर्धेला मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमींनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 


थोडे नवीन जरा जुने