उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील ओवळे या गावातील बहुतांश ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडको ने अतिक्रमणाची कारवाई करण्याचा प्रयत्न केला.अनेक वेळा हा प्रयत्न सिडकोच्या माध्यमातून करण्यात आला. प्रत्येक वेळी ही कारवाई रोखण्याचे काम गोरगरिबांचे कैवारी,झुंझार कामगार नेते रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
लोकनेते दि. बा पाटील साहेब यांचे वाक्य होते कि हुतात्म्यांचे रक्त वाया जात नसतं, आणि ते जाऊ द्यायचं ही नसतं, हे दि. बा पाटील साहेब यांचे शब्द ने महेंद्र घरत तंतोतंत पाळत आहेत. सिडको अधिकारी पोलिसांचा फौज फाटा घेऊन ओवळे ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाईसाठी आले असता लोकांचे सेवक, साडेबारा टक्के चे जनक असणारे दिवंगत दि. बा पाटील साहेब यांचा वारसा चालवणारे नेते म्हणून संपूर्ण रायगड मध्ये ज्यांची ओळख आहे असे महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या सहकार्यांना घेऊन आपल्या स्टाईलने ओवळे ग्रामस्थांवर आलेला या संकटावर आपल्या परीने मार्ग काढून ही कारवाई रोखण्यामध्ये यश निर्माण केले.ज्याप्रमाणे दि बा पाटील साहेब यांनी अनेक नागरिकांना संघर्ष करून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याप्रमाणे आज ओवळे गावात सिडकोचे अतिक्रमण पथक आले असल्याची बातमी महेंद्र घरत यांना समजली तातडीने ते धावत पळत कारवाईच्या ठिकाणी पोहचले व कारवाई रोखण्यामध्ये यशस्वी झाले.
यावेळी त्यांनी डेपोटी कलेक्टर श्री डावरे यांच्या सोबत वाटा घाटी करून सिडको चे एमडी , जेएमडी यांच्याशी फोन वरून संपर्क साधून कारवाई स्थगित करण्यास भाग पाडले. खऱ्या अर्थाने लोकनेते दि. बा पाटील साहेब यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन महेंद्र घरत समाजातील गोरगरिबांच्या मदतीला सातत्याने धावून जात आहेत. दि. बा पाटील साहेबांचे ते खरे राजकीय वारसदार असल्याचे आज समाजात बोलले जात आहे.
ओवळे ग्रामस्थांच्या वतीने गोरगरिबांचे कैवारी महेंद्रशेठ घरत यांचे मानले मनापासून आभार मानले.यावेळी मोर्चामध्ये पनवेल तालुका काँग्रेस अध्यक्ष नंदराज मुंगाजी, अमित मुंगाजी, सरपंच रेश्मा मुंगाजी, नंदकुमार गायकवाड, पनवेल तालुका इंटक अध्यक्ष भरत गायकवाड, दयानंद म्हात्रे, सुनील पुंडलिक पाटील, गजानन म्हात्रे, ललिता म्हात्रे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात ही कारवाई थांबवण्यासाठी उपस्थित होते.
Tags
उरण