लग्नाच्या थाटापायी बसतो कर्जाचा विळखा

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी 
पाताळगंगा : २ मार्च ,सध्या लग्न सोहळा सुरु असताना,अनेक ठिकाणी बाजार पेठ सोनं,किराणा माल,कपडे अदि साहित्यासाठी सज्य झाल्या आहेत.वाढती लोकसंख्या आणी लग्न सोहळ्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहावयास मिळत आहे.लग्न म्हणजे मान-पान आले.मात्र यासाठी वधू - वर कर्जांच्या विळख्यात सापडत चालला आहे.तालुक्यातील बहुतेक जण शेतकरी वर्ग असून त्याच बरोबर काही शेतकरी वर्गांनी आपल्या जमिनी विक्री केली आहे.मात्र काही शेतकरी वर्गांनी पुर्वीच जमिनी विक्री केली असल्यामुळे नाईलाजाने विविध माध्यमातून कर्ज काढावे लागत आहे.             तालुक्यातील प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न अल्प त्यातच शेतमालाचे भाव हवे तसे मिळत नाही.परंतु लग्नकार्य अपरिहार्य असल्याने ते करण्यासाठी दोन तीन दिवसांच्या सोहळ्यात दोन ते पाच लाखाचा चुराडा होतो आहे.मंदिरात होणारे लग्न आता लाखो रूपये भाडे असलेल्या मंगल कार्यालये मध्ये लग्न सोहळा लावण्याची प्रथा रुढ झाली आहे. साखर पुडा, हळद,लग्न या विधींवरही लाखोंची उधळपट्टी होते आहे. जमिनीची विक्री करून ,गृहलक्ष्मीचे स्त्रीधन तारण ठेवणे व कर्ज काढून श्रीमंतीचा आव आणणारा विवाह नाईलाजास्तव वधूवरांना करावा लागत आहे. यामुळे दोन ते तीन दिवसाच्या सोहळयात होणारा लाखोंचा खर्च कुठे तरी आर्थिक प्रगतीसाठी कुठेतरी लगाम मिळत का ?असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.काही हजारात पूर्वी होणारा विवाह सोहळा गेल्या काही वर्षात स्वत:च्या नसलेल्या श्रीमंतीचा भपका दाखविण्याच्या नादात काही लाखाच्या घरात पोहोचला आहे. डी जे. बँड , मंडप, स्टेज, लग्नपत्रिका, लग्नासाठी लागणारी भाड्याची भांडी आईस्क्रीमचे व चिकन मटणाचे भाव वाढले आहेत. तरी त्यावर भरमसाठ खर्च होतो आहे. त्यातच ग्रामीण भागात एकेकाळी लोकप्रिय असलेल्या आणि स्वस्तात मिळणाऱ्या बँजो ऐवजी आता महागड्या डी जेचे फॅड सर्वत्र पसरले आहे.या सर्व बाबीवरुन लग्नाच्या थाटापाई कर्जाचा विळखा बसत आहे.


थोडे नवीन जरा जुने