जासई हायस्कूल मध्ये जुनी पेन्शन योजना संपाच्या यशस्वीतेबद्दल आनंद उत्सव साजरा.






उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज, दहागाव विभाग जासई. ता.उरण जि. रायगड या शैक्षणिक संकुलातील सेवक वर्ग जुन्या पेन्शनसाठी गेल्या सहा दिवसापासून संपात सहभागी होता. या संपाची यशस्वी सांगता झाल्याबद्दल विद्यालयाचे शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री आणि कामगार नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते सर्व सेवकांना बुके देऊन त्यांचे अभिनंदन केले.



 विद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाइफ वर्कर अरुण घाग, उपमुख्याध्यापिका पाटील एस.एस,पर्यवेक्षिका म्हात्रे एस.सी आणि रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख या सर्वांनी प्रशासनाच्या वतीने संपकरी सेवकांना पाठिंबा व मार्गदर्शन केले होते. त्याबद्दल सर्व सेवकांनी या मान्यवरांचे आभार मानून हा संप यशस्वी झाल्या बद्दल आनंद उत्सव साजरा केला.


थोडे नवीन जरा जुने