डाऊरनगर येथे महिला कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न.
विविध वकिल व न्यायाधीशांनी महिलांना केले मार्गदर्शन.
उरण दि 10(विठ्ठल ममताबादे ) उरण तालूका विधी सेवा समिती तसेच उरण तालुन वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4/3/2023 ते 11/4/2023 या कालावधीत महिलांविषयक कायदे व या विषयावर आधारित कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात येत असून शुक्रवार दि 10 मार्च 2023 रोजी सकाळी 9 वा.साई मंदिर, डाऊरनगर, उरण येथे महिला कायदे व महिला कायदे विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.


साईमंदिर डाउरनगर येथे आयोजित कायदेविषयक शिबीरात ऍड.जिविका डाकी यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ, ऍड.आरती भोईर यांनी बाल विवाह प्रतिबंध कायदा, ऍड.सोनम ठाकूर यांनी हुंडाबंदी कायदा,ऍड.पराग म्हात्रे यांनी कौटूबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा तर ऍड.निकिता कासारे यांनी जागतिक महिला दिन या विषयावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एन. एम.वाली दिवाणी न्यायाधीश क स्तर उरण, ऍड . डी.व्ही.नवाळे अध्यक्ष उरण बार असोशिएशन, ऍड. प्रज्ञा सरवणकर, ऍड.दक्षता पराडकर, ऍड.योगिता म्हात्रे आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.


महिलांना कायदेविषयक ओळख व्हावी, कायदया विषयी समाजात जनजागृती व्हावी, कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये. आणि अन्याय झालाच तर कुठे दाद मागावे याचे ज्ञान महिलांना व्हावे या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालय,उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय यांच्या मार्गदर्शनानुसार कायदेविषयक जनजागृती शिबीर घेण्यात आल्याची माहिती न्यायाधीश एन. एम. वाली यांनी दिली.आपल्या भाषणात त्यांनी उपस्थित आदिवासी महिलांना विविध कायद्याची तोंड ओळख करून दिली. कामाच्या ठिकाणी किंवा घरात महिलांचा छळ होत असेल किंवा बालविवाह होत असेल,हूंडा घेतला असेल किवा दिला असेल किंवा कौटूबिक हिंसाचार असेल या बाबतीत कोणत्याही महिलेवर अत्याचार झाला असेल तर तिने अन्यायाविरोधात आवाज उठवून न्याय मागितला पाहिजे. आपली तक्रार कोणालाही न घाबरता पोलिस स्टेशन मध्ये नोंदवा किंवा कोर्टात सुद्धा न्याय मागता येतो.कोर्टात महिलांसाठी मोफत वकीलाचीही सोय करण्यात येईल.तक्रार करण्यासाठी पुढे या. अन्यायाविरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करा व सक्षम बना असे आवाहन न्यायाधीश एन. एम वाली यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ऍड. धिरज डाकी यांनी केले.यावेळी आदिवासी समाजातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित आदिवासी महिलांना किट वाटप करण्यात आले. किट वाटपा नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. एकंदरीत या कायदेविषयक जनजागृती शिबिराला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.थोडे नवीन जरा जुने