मोठी जुई येथील पंडित कुटुंबीयांनी अवयव दान करून ठेवला समाजापुढे आदर्श


उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील मोठी जुई येथील गावातील एमएमएसी विभागात कार्यरत रीमा महेश पंडित वय 37 वर्षे यांना गेल्या 10 दिवसांपासून मेंदूच्या गंभीर संसर्गामुळे फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 22 मार्च 2023 रोजी रात्री त्यांना मूर्त म्हणुन घोषित करण्यात आले. त्यांचे पती महेश पंडित हे देखील स्टोअर्स विभागात कार्यरत आहेत. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया असा जर विचार मनात प्रत्येकाने आणला तर समाजातील हजारो नागरिकांचे प्राण वाचतील आणि यातच पंडित कुटुंबीयांनी समाजापुढे आदर्श दाखवून दिले ते म्हणजे पती महेश पंडित यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आपली पत्नी रिमा महेश पंडित यांचे सर्व अंतर्गत अवयव ज्यात दोन मूत्रपिंड, यकृत, आतडे इत्यादी गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे


. आयुष्याच्या या कठीण काळात त्यांनी जगाला महान मानवता दाखवली आहे.मोठी जुई येथील पंडित कुटुंबीयांनी अवयव दान करून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.


थोडे नवीन जरा जुने