वैष्णवी पंढरीनाथ पाटील हिची महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता ( गट ब ) पदि होणार नियुक्ती







काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा ७ एप्रिल,
              खालापूर तालुक्यातील माजगांव - आंबीवली येथे राहणारी वैष्णवी पंढरीनाथ पाटील हिने अथक परिश्रम घेवून सरळ सेवा महाराष्ट्र अभियांत्रिकी ची परिक्षा उत्तीर्ण होवून महाराष्ट्र मधून सर्वसाधारण महिला म्हणून ७ व्या क्रमांक पटकाविले.तिने केलेल्या मेहनत आणी आई - वडीलांचे पाठबळा यामुळे तिने उंच भरारी घेवून महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता ( गट ब ) पदि नियुक्ती होत आहे.तीने हे यश संपादन केल्यामुळे खालापूर तालुक्यासह जिल्ह्यांचे नाव उज्ज्वल केल्यामुळे तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



            पहली ते दहावी शिक्षण प्रिया स्कूल येथून घेतल्या नंतर पुढील शिक्षण पिल्ले नंतर विश्वनिकेतन येथे सिविल ची पदवी प्राप्त केली.तिने केलेले अथक प्रयत्नातून यश संपादन करुन तरूण मुलांसाठी तिचे आदर्श घ्यावे.असा सल्ला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक आश्या मान्यवरांची दिल्या.वैष्णवी हिची नियुक्ती झाली आहे हे कळताच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ बालवडकर ,पोलिस उपनिरिक्षक काळे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विशाल निंबाळकर यांच्या वतीने वैष्णवी सह तीच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या


        मागिल आठवड्यापासून वैष्णवी पाटील हिची महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता पदि नियुक्ती होत असल्यांचे कळताच अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवास स्थांनी जावून शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रूप ग्राम पंचायत मा.उप सरपंच राजेश पाटील,रवि पाटील,सचिन पाटील निलेश ढवाळकर,मारुती ढवाळकर,यश ढवाळकर,संदेश ढवाळकर,राजेश ढवाळकर,मनोहर ढवाळकर,भरत ढवाळकरअदि ने त्यांच्या निवास स्थांनी जावून त्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



 
थोडे नवीन जरा जुने