लाखो रुपये खर्च करून रस्त्याकडेला बांधलेल्या फूटपाथ चार चाकी वाहनांचे अतिक्रमण








लाखो रुपये खर्च करून रस्त्याकडेला बांधलेल्या फूटपाथ चार चाकी वाहनांचे अतिक्रमण ; महानगरपालिका व वाहतूक शाखा कारवाई करणार कधी



पनवेल दि. २३. ( वार्ताहर ) : वाहनांनी वर्दळलेल्या रस्त्यावरून पादचारी नागरिकांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी महापालिकेने लाखो रुपये खर्च करून रस्त्याकडेला फूटपाथ बांधले आहेत. परंतू काही बेशिस्त वाहन चालक व काही माजोर वाहन मालक आपली चारचाकी वाहने राजरोसपणे फूटपाथवर उभी करून पादचारींचा रस्ता अडविण्याचे काम करीत असतात. 
                 महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक व वाहतूक शाखेचे टोचण वाहनावरील पोलीस पथक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. एरवी रस्त्याच्या कडेला उभी दुचाकी उचलून धन्यता मानणाऱ्या टोचन वाहनावरील वाहतूक पोलीसांना ' नो पार्कींग क्षेत्र असलेल्या फूटपाथवर उभी केलेली चार चाकी वाहने दिसून येत नाहीत कि डोळ्यावर झापड लावली आहेत.

 असा सवाल पादचारी व रहिवासी करीत असून पनवेल शहरातील एमटीएनएल रोडवर एमटीएनएल कार्यालयाबाहेर फूटपाथवर रोज राजरोसपणे दोन-तीन चार चाकी वाहने उभी केली जातात. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकांनी टोचन वाहनावरील पोलीसाकडे तक्रार केली असता दखल घेतली गेली नाही, तेव्हा वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी व महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.


थोडे नवीन जरा जुने