झी गौरव नाट्य पुरस्कार सोहळ्यात निर्मात्या कल्पना कोठारी यांच्या नाटकाला तीन पारितोषिके
पनवेल दि.१० (वार्ताहर) : पनवेलच्या नाट्य- चित्रपट निर्मात्या कल्पना कोठारी यांच्या 'चर्चा तर होणारच'या नाटकाला झी मराठीच्या झी गौरव नाट्य पुरस्कार सोहळ्यात तीन पारितोषिके मिळाली आहेत.


          यामध्ये या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक,सर्वोत्कृष्ट लेखन- हेमंत एदलाबादकर,सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आदिती सारंगधर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी यांच्यावतीने त्यांचे सुपुत्र नील विलास कोठारी तसेच अभिनेत्री आदिती सारंगधर,हेमंत एदलाबादकर यांनी ही पारितोषिके स्वीकारली.


कोट - पारितोषिके म्हणजे चांगल्या नाट्यकृतीची पोहचपावती- कल्पना कोठारी 
ही पारितोषिके म्हणजे चांगल्या नाट्यकृतीची पोहचपावती आहे, नाट्यकृतीला पुरस्कार मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना कल्पना कोठारी यांनी सांगितले. समाजासाठी काहीतरी नवीन नाट्य निर्मिती आणि नव्या पिढीला यातून काहीतरी शिकता येईल ही जबाबदारी या पुरस्कारामुळे आमच्यावर आली असल्याचे कल्पना कोठारी यांनी सांगितले.थोडे नवीन जरा जुने