पनवेल दि ०७ (संजय कदम) : बी.जी. शिर्के बांधकाम साईड ०६ चे अकराव्या माळ्यावर एका इसमाने सिलिंगला नायलॉन च्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तळोजा फेज २ येथे घडली आहे.
सदर ठिकाणी अंदाजे (वय २४) वर्षे, रंग सावळा, अंगाने मध्यम , केस काळे भुरकट, नाक सरळ, चेहरा उभट असे वर्णन असलेल्या इसमाने अज्ञात कारणावरून रूम नंबर ११०६ मधील हॉल मध्ये असलेल्या सिलिंगला नायलॉन च्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे संपर्क ०२२-२७४१२३३३किंवा सपोनि सुनील गुरव मो.नंबर ९४०३४४२०४२ येथे संपर्क साधावा
Tags
पनवेल