आदिवासींच्या मदतीसाठी चाईल्ड केअर सामाजिक संस्था आयोजित चाईल्ड केअर आधार चषक उत्साहात संपन्न.






उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
चाईल्ड केअर सामाजिक संस्था, उरण रायगड चे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली आजपर्यंत अनेक वर्ष विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत.विशेष म्हणजे आदिवासी वाड्यामध्ये आदिवासी मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य अनेक वर्ष अनेक आदिवासी वाड्यात वाटप करत आहेत. 



त्याच प्रमाणे आदिवासी बंधू भगिनींना कपडे, अन्नधान्य विविध गोष्टीचे मार्गदर्शन, दिवाळी सणचे वाटप या सारख्या छोट्या मोठ्या आदिवासी बंधु भगिनी ना अनेक वर्ष मदत करत असलेली संस्था म्हणजे चाईल्ड केअर सामाजिक संस्था.या संस्थेतर्फे रविवार 16/4/2023 रोजी संस्थे चे संस्थापक- विकास कडू यांच्या मार्गदर्शना खाली आदिवासी मुलाच्या आणी आदिवासी बंधू, भगिनीच्या मदतीसाठी उरण तालुक्यातील सिद्धिविनायक मैदान सोनारी येथे आधार चषक आयोजित केले होते. 



या आधार चषकचे उदघाटन सोनारी गावचे अध्यक्ष राकेश कडू यांच्या शुभ हस्ते झाला.या आधार चषकला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. कुणाल पाटील (सरपंच पागोटे ),प्रेमनाथ ठाकूर (सरपंच धुतूम ), दत्ता हरिचंद्र ठाकूर (समाजसेवक कवीलवाले ), सुजित तांडेल (उपसरपंच, पागोटे ) सुदेश पाटील (अध्यक्ष -छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ), विठ्ठल ममताबादे (कार्याध्यक्ष -छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ), विजय पाटील (अध्यक्ष -उरण उलवे नोड 40+



 असोसिएशन.),अंकुश घरत (माजी अध्यक्ष -सावरखार ), प्रवीण घरत (उपसरपंच -सावरखार ), जितेंद्र ठाकूर (माजी अध्यक्ष सावरखार ), किशोर कडू (सोनारी ऑलराऊंडर ), मनोज कडू (माजी कर्णधार सोनारी 40+), मयूर (MS विराट फुंडे ), आतिष पाटील (सुप्रसिद्ध समालोचक ), हसुराम घरत (समाजसेवक, सावरखार ), प्रमोद कडू (माजी सदस्य सोनारी ) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण रायगडचे संस्थापक विकास कडू आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि "या आयोजनातून मिळालेला निधी 100% आदिवासी बांधवांच्या साठी उपयोग केला जाईल, या आयोजनासाठी सोनारी गावचे अध्यक्ष राकेश कडू, MS लॉजिस्टिकचे सुनील कडू आणि कुणाल पाटील (सरपंच पागोटे )यांनी जी आर्थिक मदत केली त्यांचे संस्था ऋणी राहील तसेच सोनारी गावचे आमचे मित्र किशोर कडू (40+ऑलराऊंडर ), मनोज कडू (माजी कर्णधार 40+सोनारी ),हिराचंद्र तांडेल (40+करल टीम मॅनेजर ) यांचे विशेष आभार मानतो.यांनी हे आयोजन पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.






तसेच संस्थेच्या प्रत्येक सभासदांनी आप आपले काम अगदी चोख प्रकारे पार पाडले. यासाठी सर्वांचे आभार मानतो या आयोजनात ज्यांनी ज्यांनी आमच्या संस्थेला सहकार्य केले त्यांचे सर्वांचे आभार " या शब्दात विकास कडू यांनी सर्वांनी आभार मानले.तसेच सोनारी गावचे अध्यक्ष राकेश कडू यांनी आपल्या मनोगत मांडताना म्हणाले कि "


चाईल्ड केअर सामाजिक संस्था आज वर उरण नव्हे तर रायगड मध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे, या संस्थे ला सर्वानी हात भार लावला पाहिजे. मी या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आमचे मित्र विकास कडूचे विशेष कौतुक करेन कारण त्यांनी हि संस्था आज उरण नव्हे तर रायगड जिल्हात नावा रुपाला आणली, मी या संस्थे च्या प्रत्येक उप क्रमाला माझ्या परीने नेहमी सहकार्य करीत राहीन 
"


या स्पर्धेत प्रथम क्रमांक बाबादेव बोकडवीरा टीम ने पटकावला.तर द्वितीय क्रमांक 40 विंधणे या टीमने पटकावला.यांनामान्यवरांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. संस्थेतर्फे विकास कडू (संस्थापक -अध्यक्ष ), विक्रांत कडू (कार्याध्यक्ष ), मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष ), तुषार ठाकूर (उपाध्यक्ष ), ह्रितिक पाटील (उपाध्यक्ष ), निवृत्ती ठाकूर (खजिनदार ), राजेश ठाकूर (सह सचिव ), उद्धव कोळी (सह खजिनदार ), नरेद्र घरत, भूषण कडू, समीर पाटील, आमोल डेरे, विनय पाटील, आदित्य पारवे, विवेक कडू या सभासदांनी आयोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विकास कडू यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने