तरुणी बेपत्ता
तरुणी बेपत्ता
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : कामोठे येथे जाऊन येतो असे सांगून मित्रा सोबत बाहेर पडलेली २० वर्षीय तरुणी पुन्हा घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.


नेरे येथील महालक्ष्मी नगर येथे राहणारी प्रांजली शाम बिंदल हि तिचा मित्र गर्व उर्फ शिवंम राहुल त्यागी (वय २२) याचे सोबत राहते घरातुन बाहेर पडली मात्र पुन्हा घरी परतलीच नाही. प्रांजलीची उंची ५ फूट ३ इंच असून तीचा चेहरा उभट, केस काळे लांब, नाक सरळ, डोळे काळे, वर्ण गोरा, बांधा सडपातळ, दोन्ही कानामध्ये रिंग घातलेले आहे.


 तसेच अंगात लाल रंगाचा टॉप, निळया रंगाची जिन्स पॅन्ट व पायात काळया रंगाचा शुज घातलेले आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२४४४ किंवा पोलीस हवालदार ए.बी.शिंदे यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने