मे महिना आणि आंबा असं समीकरणचं आहे. सध्या आंब्याचा सीजन आहे. बाजारात विविध प्रकारचे आंबे आले आहेत. अनेक जण आंबा म्हटलं की अगदी ताव मारतात. आंब्यात भरपूर प्रमाणात बीटा-कॅरोटीन आणि विटॅमिन ए असतं. आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. आंब्याचा मोसम जेमतेम दोन तीन महिन्यांचा. पण तेवढ्या काळात आपल्या जिभेचे पुरवता येतील तेवढे चोचले पुरवून हे फळ साक्षात अमृताची अनुभूती देत असतं…
‘आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’ सर्वानी आपल्या लहानपणी आंब्याचे हे गाणे नक्की ऐकले असेल. आंबा या नावातच एक वेगळे माधुर्य आहे. ‘आम्र’ या संस्कृत नावात तर मस्त राजेशाही थाट आहे. उगाच नाही आंब्याला फळांचा राजा म्हणत. चव, रंग, रूप प्रत्येक बाबतीत आपला आब राखून असलेले फळ. फळांचा राजा असलेला आंबा लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत आवडीचे फळ आहे
. सध्याच्या मोसमात आंब्यांची मोठी रेलचेल आणि मागणी आहे. त्या अनुषंगाने मोहोपाडा रसायनी परिसरात विविध फळांसाठी प्रसिद्ध असलेले फळविक्रेता मंगेश घाडगे यांच्या दुकानात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात फळे मिळत आहेत, त्यामुळे दुकानात आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
Tags
रसायनी