माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून कामोठेत कबड्डी लीगचा थरार
माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारपासून कामोठेत कबड्डी लीगचा थरार 

पनवेल(प्रतिनिधी) समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्व देणारे पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने १७ व १८ मे रोजी कामोठेत प्रकाश झोतातील कबड्डी लीगचा थरार पहायला मिळणार आहे.        सेक्टर ०६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कुलच्या प्रांगणात होणाऱ्या या स्पर्धेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून स्पर्धेचे उदघाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवार दिनांक १७ मे रोजी सायंकाळी ०४ वाजता करण्यात येणार आहे.


 
       युवा नेते परेश ठाकूर यांना क्रीडा क्षेत्राची मोठ्या प्रमाणात आवड आहे. मॅरेथॉन, टेनिस, बॅडमिंटन, कबड्डी, फुटबॉल अशा विविध क्रीडा स्पर्धांचे ते भव्य आणि उत्कृष्ट नियोजनात आयोजन करीत असतात. त्यांची क्रीडा विषयी आत्मीयता पाहता त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने 'खेलो युवा- स्पोर्ट्स मुमेंट' या शीर्षकाखाली फुटबॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल अशा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. 


त्या अनुषंगाने कामोठे येथे होणाऱ्या तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धेचे जोरदार तयारी झाली आहे. हि स्पर्धा पुरुष गटात होणार असून विजेत्यास २१ हजार १११ रुपये, उपविजेत्यास १५ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकास ११ हजार १११ रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. थोडे नवीन जरा जुने