सभापती पदी संतोष जंगम तर उपसभापती पदी जयवंत पाटील बिनविरोधशेकापक्षाची खालापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद सत्ता कायम
सभापती पदी संतोष जंगम तर उपसभापती पदी जयवंत पाटील बिनविरोध


काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २६ मे ,
             खालापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापक्षाने गेल्या १५ वर्षापासून निर्विवाद एकहाती सत्ता कायम ठेवली आहे. सभापतीपदी शेकापक्षाचे नेते,खालापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम तर उपसभापतीपदी जयवंत पाटील बिनरोध निवड गुरूवारी घेण्यात आलेल्या निवडणुकी दरम्यान करण्यात आली आहे.दरम्यान शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी करून जंगम यांचे अभिनंदन केले आहे. 

 
          खालापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक गुरुवारी घेण्यात आली. सभापतीपदासाठी संतोष जंगम तर उपसभापती पदासाठी जयवंत पाटील यांचा या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले होते. विरोधी अर्ज न आल्याने निवडणूक अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी जंगम यांची सभापती तर पाटील यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत जंगम व पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहे.
     या निवड प्रक्रिये दरम्यान नवनिर्वाचित सदस्य रामभाई देशमुख, निकेशभाई देशमुख, निलेश घोसाळकर, नारायण पाटील, भूषण कडव, शांताराम पाटील, हनीफ दुदुके,धनंजय देशमुख, शिवानी जंगम राष्ट्रवादीचे संचालक अजित देशमुख सभागृहात उपस्थित होते.            तर निवड घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यानी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली यावेळी शेकाप तालुका चिटणीस संदीप पाटील संचालक जिल्हा बँकचे प्रवीण लाले ,अजय भारती, चंद्रकांत पाटील, दिलीप पोरवल, राजू अभाणी, नरेंद्र शहा, नथुराम कांगे, चंद्रकांत घोसाळकर,दिलीप कांबळे अभिजित ठाकूर,मा. उप सरपंच माजगांव राजेश पाटील,किशोर पाटील,सरपंच गोपीनाथ जाधव,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

थोडे नवीन जरा जुने