सारडे गावठाण विस्तार सिमांकनाचे उद्‌घाटन
सारडे गावठाण विस्तार सिमांकनाचे उद्‌घाटन उरण दि 28 (विठ्ठल ममताबादे) उरण तालुक्यातील सारडे, वशेणी, पुनाडे या गावांच्या जमिनी महाराष्ट्र शासनाच्या एम आय डी सी प्रकल्पाला हव्या आहेत. शासनाने तसे हालचाली सुद्धा सुरू केल्या आहेत.सारडे पुनाडे, वशेणी येथे होणाऱ्या एम आय.डी. सी ला सारडे,वशेणी, पुनाडे ग्रामस्थांनी जोरदारपणे तीव्र विरोध केला आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांनी शासकीय विभागात, शासकीय कार्यालयात हरकती नोंदवून या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. गाव वाचविण्याच्या दृष्टी कोणातून व नैसर्गिक गरजेपोटी बांधलेली घरे शासनातर्फे अधिकृत करण्यात यावी व मूळ गावाचा गावठाण विस्तार व्हावा या अनुषंगाने सारडे गावातील ग्रामस्थांनी गावठाण विस्तार चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शना खाली सारडे ग्रामविकास समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या माध्यमातून सारडे गावात व गावाच्या आजूबाजूच्या परिसरातही गावठाण विस्ताराबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
 गावाचे अस्तित्व व स्थानिक भूमीपुत्रांचे अस्तिव अबाधित ठेवायचे असेल तर गावठाण विस्तार हेच मूलभूत व एकमेव अशी प्रभावी उपाययोजना असल्याने सारडे ग्रामविकास समितीने गावठाण विस्तार करण्याचा निर्णय घेतला. शनिवार दि 27 मे 2023 रोजी सारडे ग्रामविकास समितीच्या माध्यमातून सारडे गावठाण विस्तारच्या सीमांकनाचे उदघाटन सकाळी 10 वाजता सारडे मधील महेश पाटील यांचे घर येथे करण्यात आले.गावठाण विस्तार काळाची गरज असल्याने त्याचे महत्त्व ओळखून सारडे गावात सीमांकनाचे उदघाटन करण्यात आले यावेळी पिरकोन ग्रामपंचायतचे सरपंच कलावती पाटील,वशेणी ग्रामपंचायतचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पुनाडे येथील सामाजिक कार्यकर्ते,सारडे ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील,सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज कृष्णा पाटील,उपाध्यक्ष संदिप धनाजी पाटील,सचिव विशाल हरिश्चंद्र म्हात्रे,खजिनदार प्रितम घनश्याम म्हात्रे,सह खजिनदार - भूषण म्हात्रे,सागर पाटील,शक्ती वर्तक,सल्लागार -शांताराम म्हात्रे,कायदेशीर सल्लागार- ऍड.हिरामण पाटील,सदस्य-भार्गव म्हात्रे,उत्तम म्हात्रे,महेश पाटील, समाधान पाटील, आदेश पाटील, राज पाटील,धनंजय माळी,अमित म्हात्रे, कृष्णकांत पाटील,सारड्याचे ग्रामस्थ म्हणून युवासेनेचे महाराष्ट्र सचिव रुपेश पाटील, ए डी पाटील सर,शामकांत पाटील,छ ल पाटील,ध प पाटील,सुनील पाटील,एम एस पाटील ,जी आर म्हात्रे,जो ल पाटील,उपसरपंच जीवन पाटील ,सारडे ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील,अमित म्हात्रे,अमिता पाटील,कामिनी पाटील,प्रतीक्षा पाटील,अस्मिता पाटील तसेच मोठ्या संख्येने सारडे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी श्री गणेशमूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्तावना एस. के. म्हात्रे यांनी केले. तर सुत्रसंचालन विलास पाटील यांनी केले. उदघाटनप्रसंगी सारडे ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील यांनी गावठाण विस्तार महत्वाचे असून एम. आय.डी. सी.च्या प्रकल्पला आमचा विरोध आहे. गावच्या विकासासाठी जनतेच्या कल्याणासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसोबत आहोत. घरे वाचविण्यासाठी, गाव वाचविण्यासाठी सारडे ग्रामपंचायतचे सर्वतोपरी सहकार्य सारडे ग्रामविकास समितीला तसेच ग्रामस्थांना असेल असे सांगितले.


यावेळी अध्यक्ष मनोज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की सारडे ग्रामस्थ आपण एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत. गावठाण विस्तार साठी सीमांकनाचे उदघाटन करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. 1965 पासून आपल्या गावचे गावठाणविस्तार झाले नव्हते. आपल्या जमिनी व घरे गिळंकृत करणारे एमआयडीसी सारखे प्रोजेक्ट आपल्या गावात व गावाच्या आजूबाजूला येत असताना आपली घरे व विस्तारित गावठाण वाचवण्यासाठी गावठाणविस्तार ही काळाची गरज ओळखून "सारडे ग्रामविकास समिती" तर्फे आपल्या गावच्या सीमांकनाला आज शनिवार दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता सुरुवात होणार आहे.पहिल्यांदा आपले गाव, गावठाण मोजणार आहोत 
ही गावठाणविस्ताराची पहिली पायरी आहे. आपण सारड्याचे ग्रामस्थ व या परिसरातील सुजाण नागरिक म्हणून ह्या मोजणीला शनिवार, गुरुवार व शुक्रवारी प्रत्यक्ष हजर राहून ह्या ऐतिहासिक क्षणांचे सोबती व्हाल ह्याची सारडे ग्रामविकास समितीला खात्री आहे. यामुळे एमआयडीसी सकट येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टला चाप बसणार आहेच. त्याचबरोबर हे गावचे पुरावे तयार करून आपण एमआयडीसी ला कोर्टात कायदेशीर विरोधही करणार आहोत.त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावठाण विस्तार चळवळीत सहभागी व्हावे. सारडे ग्रामविकास समितीला सहकार्य करावे असे आवाहन सारडे ग्रामविकास समितीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी यावेळी केले.


थोडे नवीन जरा जुने