विकसित उलवे नोड मध्ये सार्वजनिक सुलभ शौचालयाची शिवसेनेची मागणी.





विकसित उलवे नोड मध्ये सार्वजनिक सुलभ शौचालयाची शिवसेनेची मागणी.


  उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )उलवे गव्हाण जिल्हा परिषद मतदार संघातील विकसित होत असलेल्या उलवे नोडमध्ये सार्वजनिक शौचालयाची मोठी गरज ‌ निर्माण झालेली आहे. येथे इमारत बांधकामासाठी येणाऱ्या कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा कामगारांना आजही मुतारीसाठी व शौचालयासाठी उघड्यावर जावं लागत आहे. 



तर विकसित उलवे नोड येथे येणाऱ्या नागरिकांसाठी मुतारी व सुलभ शौचालयाची कुठेही सोय नाही. प्रकल्पग्रस्त गावातील शौचालयांची संख्या अत्यल्प आहे. क्षमतेनुसार सिडकोने शौचालय बांधली नाहीत. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.जन संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे असेच जर चालू राहिले तर घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन उलवेकरांचे आरोग्यात धोक्यात आले आहे.साथीचे आजार फैलावण्याची भीती मोठी आहे. 


याबाबतचे पत्र शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना )पक्षाचे गव्हाण जिल्हा परिषद प्रमुख प्रभाकर पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांना नुकतेच दिले आहे. याबाबत आवश्यक ते सर्वेक्षण करून सिडको ने निधी उपलब्ध करावा. स्वच्छ निरोगी उलवे शहर विकसित करून उत्तम आरोग्यदायी निरोगी जीवन जगण्याची संधी द्यावी‌ अशी विनंती वजा मागणी प्रभाकर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.


थोडे नवीन जरा जुने