उन्हाळ्यातून पिकलेला फणस ग्राहकांच्या चवीस दाखल






उन्हाळ्यातून पिकलेला फणस ग्राहकांच्या चवीस दाखल
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : पनवेल बाजारात परराज्यातून कच्च्या फणसाची वर्षभर आवक होत असते. हा फणस ग्राहक भाजीसाठी घेऊन जातात. मात्र, आता उन्हाळ्यापासून पिकलेल्या फणस पनवेलच्या बाजारात यायला सुरुवात झाली आहे. 


              कोकणातील फणस म्हणून फणसाची ओळख असली, तरी सध्या बाजारात मात्र दक्षिण भारतातून फणसाची मोठी आवक होत असते. वटपौर्णिमेसाठी मात्र कोकणातून फणस बाजारात येतो. त्यामुळे फणसाची आवक वाढते. कोकणातून येणारा फणस काटेरी असतो, तर दक्षिण भारतातून येणारा फणस हा मोठा आणि गोल काट्यांचा असतो. त्यामुळे ते टोचत नाहीत. 



यातील गरेही मोठे असतात. यात कापा जातीचाच फणस अधिक असतो. त्याला चांगली मागणी असते. सध्या घाऊक बाजारात कच्च्या फणसाचे दर २० ते २५ रुपये किलोपर्यंत आहेत, तर पिकलेल्या फणसाचे दर १६ ते ३६ रुपये किलो आहेत. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घाऊक बाजारात कच्च्यासोबत पिकलेल्या फणसाची आवक आणखी वाढली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परराज्यातील गोड फणस खाण्याची संधी पनवेलकरांना मिळाली आहे.




थोडे नवीन जरा जुने