श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयास मिळणार संजिवनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ५० लाखाची देणगी







श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयास मिळणार संजिवनी; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची ५० लाखाची देणगी


पनवेल(प्रतिनिधी) मातृसंस्था मानून रयत शिक्षण संस्थेसाठी नेहमीच सढळ हस्ते मदत करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ५० लाख तर जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांनी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयास केली आहे. या मदतीचा धनादेश रयतचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला.


   जिल्हा अहमदनगर तालुका राहूरी येथील सात्रळ येथील रयत संकुलात मुलींसाठी स्वतंत्र विद्यालय आहे. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतः सात्रळ गावी येऊन स्वर्गीय कॉम्रेड पी. बी. कडू पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने रयत ची शाखा सुरु केली. शाखेची नंतर मुले आणि मुली विभाग अशी विभागणी झाली. सध्या मुली विभागासाठी असलेली इमारत पूर्णपणे निकामी आणि धोकादायक स्थितीत आहे.



 त्यामुळे कन्या विद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पाडून नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासह मान्यवरांनी भेट घेत याची माहिती दिली. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी ५० लाख तर जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांनी २५ लाख रुपयांची अर्थिक मदत केली आणि या मदतीचा धनादेश सुपूर्द केला. 




यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, कृष्णागर जेजुरकर, प्रगती संस्थेचे चेअरमन विजयराव कडू पाटील, हनुमंतगावचे माजी सरपंच भास्करराव फणसे, युवानेते किरण कडू पाटील, रयचे सेवक संघटनेचे भाऊसाहेब कडलग, उपशिक्षक स्वप्नील देशमुख, वैभव वसावे, मंगेश कडलग उपस्थित होते. इमारत बांधकामासाठी मदत केल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत यांचे उपस्थित मान्यवरांनी आभार मानले.



थोडे नवीन जरा जुने