पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के ; विद्यार्थ्यांसह पालकांचे केले अध्यक्ष इकबाल काझी यांनी अभिनंदनपनवेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा दहावीचा निकाल १०० टक्के ; विद्यार्थ्यांसह पालकांचे केले अध्यक्ष इकबाल काझी यांनी अभिनंदन
पनवेल दि.०३(संजय कदम): पनवेल शहरासह तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांचा दहावीचा निकाल यंदा १०० टक्के लागल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे व या सर्वांचे अभिनंदन इकबाल काझी यांनी केले आहे.
 या मध्ये याकूब बेग हायस्कूल & ज्यु कॉलेज पनवेल सेमी इंग्लिश विभागाचा १००% लागला आहे. त्यामध्ये मासिरा सादिक शेख (९३%) प्रथम, बतूल हनिग पटेल (८७.६०) द्वितीय, अफ्रा नजीब दळवी ८६% तृतीय आला आहे. त्याचपमाणे अँग्लो उर्दू हायस्कूल, बारापाडा या शाळेचाही निकस १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये नहरीन दळवी ९१.२०% मिळवत प्रथम, झुबिया दळवी ८२.४०% द्वितीय व लमतुरे फातिमानाज ७९ % गुण मिळवून तृतीय आली आहे. त्याचप्रमाणे नॅशनल उर्दू हायस्कूल तळोजा या शाळेचाही निकाल १०० टक्के लागला. या शाळेतील दहावीच्या परीक्षेत १३६ विद्यार्थी बसले असून ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये प्रथम ताइब अर्शद पटेल ९३.२०%, द्वितीय आदिला फारूक पटेल ९०.८० % व खदिजा मुनाफ मुल्ला ९०.२० & मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे प्रेसिडेंट इकबाल हुसेन काझी यांच्यासह सर्व कमिटी पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे अभिनंद करून पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 
थोडे नवीन जरा जुने