पहिली राज्यस्तरीय थाई किक बॉक्सिंग स्पर्धामध्ये रायगड जिल्ह्याला प्रथम अजिंक्यपद.

उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )दिनांक 1,2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूट येथे झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय निवड चाचणी थाई किकबॉक्सिंग स्पर्धा अतिशय उत्कृष्टरित्या संपन्न झाली.नागपूर, पनवेल, नाशिक, पिंपरी चिंचवड, रायगड पुणे व सोलापूर जिल्ह्यांमधून स्पर्धक आले होते.स्पर्धेचे विजेतेपद 51 सुवर्णपदकासह रायगड जिल्ह्याने फटकाविले. तर उपविजेतेपद 27 सुवर्णपदकासह पिंपरी चिंचवडने पटकाविले. पुणे जिल्ह्याने 20 सुवर्णपदकासह तृतीय क्रमांक पटकावले.स्पर्धेतील प्रो टायटल बेल्ट स्पर्धेत पुरुष गटात 50 किलो खालील वजन गटात रायगडचा दीपक पवार(करंजाडे-पनवेल )विजेता ठरला तर 60 किलो वरील वजनगटात पनवेलचा साहिल सिनारे विजेता ठरला.विजयी झालेल्या सर्व खेळाडूंची निवड गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे.


स्पर्धेचे उदघाटन सिंहगड इन्स्टिट्यूटचे वाडेकर सर,महाराष्ट्र थाईबॉक्सिंगचे कार्याध्यक्ष संतोष म्हात्रे, सचिव निलेश भोसले, सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हिम्मत डेंगळे, विकास बडदे, अतुल गोडसे ,चिंतामणी मोकल, मोहिन बागवान, परवेज शेख , प्रवीण वाघ, सचिन लिमसे ,अनुज भोसले , वरद केनी, रोहित थळी ,कार्तिक वाघ यांच्या हस्ते झाले.सर्व विजेता खेळाडूंना ऑल इंडिया थाई किक बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष संतोष म्हात्रे व यु.स.के.ऐ इंडियाचे अध्यक्ष मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने