कामोठेत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वृक्ष लावून स्व. आ. दत्तूशेठ पाटील (तात्या) यांची जयंती आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा !
समृद्धी महामार्गावरील झालेल्या अपघातामुळे व्यथित झालेले शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा चिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आपला वाढदिवस साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम रावबून साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस तसेच स्व. दत्तूशेठ पाटील (तात्या) यांच्या जयंतीचे औचित्य साधून कामोठे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने १०० झाडांचे वृक्षारोपण आणि संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी पिंपळ, बदाम, पेरू, अशोका, नारळाची झाडे खांदेश्वर स्टेशन परिसरात लावण्यात आली.
यावेळी शेकाप माजी नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे, प्रमोद भगत, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस सूरदास शेठ गोवारी, उपाध्यक्ष नितीन भाऊ पगारे, कार्याध्यक्ष भाई गौरव पोरवाल, चिटणीस पंडितशेठ गोवारी, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, प्रमुख संघटक अल्पेश माने, सचिन झणझणे, तुकाराम औटी, महिला शहर अध्यक्षा उषा झणझणे, कार्याध्यक्षा शुभांगी खरात तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गौरव पोरवाल यांनी विशेष मेहनत घेतली.
Tags
पनवेल