सिंधुदुर्ग ज़िल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल तर्फे इर्शाळवाडीत कार्य करणाऱ्या एन डी आर एफ व अन्य टीमला मदतीचा हातसिंधुदुर्ग ज़िल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल तर्फे इर्शाळवाडीत कार्य करणाऱ्या एन डी आर एफ व अन्य टीमला मदतीचा हात 
पनवेल दि. 23 ( वार्ताहर ) : सलग दोन दिवस संध्याकाळी सिंधुदुर्ग ज़िल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल येथील मंडळाचे सदस्य दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीत कार्य करणाऱ्या एन डी आर एफ व अन्य टीम थकून परतत असताना त्यांना चहा बिस्कीट सेवा दिली,जवळपास १००० च्यावर चहा आणि बिस्कीट दोन्ही दिवशी सपोर्टींग टीमला दिला. 


                   सतत पावसात भिजलेल्या लोकांना हा चहा मिळाल्यामुळे त्यांचा थकवा दूर करण्यासाठी आधार झाला. पोलीस, वैद्यकीय डॉक्टरर्स आणि वाडीवरून खाली उतरणाऱ्या टीम्सनी मंडळाच्या हया कार्याचे कौतुक करून आभार मानले,सदर मोहिमेत अध्यक्ष केशव राणे,उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर, स्वप्नाली देसाई, अर्चना तावडे,सई राणे,आरती सावंत,स्वप्ना राणे,बाबाजी नेरूरकर,गुरूदास वाघाटे,प्रदीप रावले,सूर्यकांत देसाई,रंगनाथ नेरूरकर,सौरभ राणे, प्रतीक भोजने,संतोष नेरुरकर,यश मोचेमाडकर अशोक चव्हाण,जया परब,संकेत पवार,अनिकेत पालव यांनी सहभाग घेतला.थोडे नवीन जरा जुने