पनवेल दि.२९(संजय कदम): सद्गुरू श्री साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने यांच्या ४८ व्या वर्षी पनवेल परिसरातील ६०० शालेय विद्यार्थ्यांना पनवेल रेल्वे स्टेशन जवळील साईबाबा मंदिरात येत्या रविवारी दिनांक ३० जुलै २०२३ रोजी दुपारी १२ ते २ या वेळात शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, पावसाच्या कारणामुळे शाळा बंद असून या कार्यक्रमाला लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होणार नसल्याने सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून हा कार्यक्रम ६ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
श्री साई नारायण बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साई नारायण बाबा आश्रम, श्री साई बाबा मंदिर पनवेल यांच्यावतीने यांच्या ४८ व्या वर्षी सद्गुरू साई नारायण बाबा यांच्या आशीर्वादाने पनवेल परिसरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांसह शाळेचा गणवेश व दप्तरचे वाटप करण्यात यांत होते मात्र पावसामुळे शाळा बंद असल्याकारणाने सदर च्या कार्यक्रमाला लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होणार नसल्याने हा कार्यक्रम ६ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे पदाधिकारी रामलाल चैधरी यांनी दिली आहे.
Tags
पनवेल