कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद,.






कर्मचाऱ्यांच्या समस्या त्वरित सोडविण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने नगर परिषद कार्यालय समोर निदर्शने.





उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक डॉ. डी एल कराड , ॲड सुरेश ठाकूर, डी पी शिंदे, रामगोपाल शर्मा, राज्याचे मुख्य संघटक, संतोष पवार, ॲड सुनील वाळूंजकर यांनी महाराष्ट्रातील तमाम नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या प्रदिर्घ काळापासून प्रलंबित विविध मागण्याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी मुंबई येथे भव्य राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले होते. परंतु ३१ जुलै २०२३ रोजी विधान सभेचे कामकाज २९ जुलै ते १ ऑगस्ट २०२३ पर्यंत बंद आणि पुर परिस्थिती , मदत कार्याकरीता कामगारांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने नियोजित मोर्चा तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. व राज्य पातळीवर संघटनेच्या झालेल्या निर्णयानुसार शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज राज्यातील बहूतांश नगरपरिषदे समोर निदर्शने करण्यात आली आहेत.



 शासनाकडे संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या मागण्यांचे निवेदन कर्मचाऱ्यांच्या भावना व प्रलंबित मागण्या शासनाकडे पोहोचवाव्यात अशी विनंती निदर्शनाद्वारे तसेच निवेदन देऊन प्रशासनाकडे करण्यात आली.आणि आज आम्ही सर्व कर्मचारी नगर परिषदेसमोर निदर्शने करीत आहोत या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास भविष्य काळात कामगारांमधील असंतोषाचे राज्यव्यापी आंदोलनामध्ये रूपांतर होणार याची नोंद शासनाने घ्यावी अशा आशयाचे निवेदन नगरपरीषदे मार्फत शासनाला देण्यात यावे असे निवेदन मुख्याधिकारी राहूल इंगळे यांना कामगार नेते संतोष पवार, मधूकर भोईर, हरेश जाधव, राजेश सोलंकी, धनंजय आंब्रे, जितेंद्र जाधव व ईतर कामगार बंधू भगिनींनी दिले. 




या प्रसंगी कामगार नेते संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त करताना नगरपरीषदे समोर निदर्शने केली. आणि शासनाने नगरपरीषद आणि नगरपंचायतीमधील कामगार आणि ईतर शासकीय कामगारांमध्ये दुजाभाव करणे बंद करून सर्वांना समान न्याय द्यावा या विषयावर मनोगत व्यक्त केले.कामगारांच्या मागण्या संदर्भात मा. श्री.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री,अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, सचिव - नगर विकास विभाग, महा आयुक्त तथा संचालक नगर परिषद संचालनालय नवी मुंबई,जिल्हाधिकारी यांनाही पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती कामगार नेते संतोष पवार यांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने