पावतु सामाजिक संस्था मोरावे च्या वतीने गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप.







पावतु सामाजिक संस्था मोरावे च्या वतीने गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप.

 उरण दि 25(विठ्ठल ममताबादे )सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी मोरावे नवी मुंबई येथील "पावतु सामाजिक संस्था मोरावे." या संस्थे मार्फत कोरोना च्या काळात सुद्धा भरीव असे सामाजिक कामे करण्यात आली.



 आदिवासी बांधवाना संसार उपयोगी सामान, अन्नदान अशी सामाजिक कामे करीत असताना मोरावे गावातील 99 निराधार महिलांना दरमहा 1200 रुपयांचे आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम या संस्थे मार्फत चालू आहे.नुकताच या संस्थे मार्फत सामाजिक बांधिलकी जपत राजिप शाळा मोरावे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.



सदर कार्यक्रम प्रसंगी साई देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, पालतू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल म्हात्रे,उपाध्यक्ष वर्षा म्हात्रे,सचिव विनय म्हात्रे,सदस्य जनार्दन म्हात्रे,चंद्रकांत म्हात्रे, शांताराम पाटील,राधिका राहुल म्हात्रे, करिश्मा म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, काशिनाथ म्हात्रे , राजेंद्र म्हात्रे,वृषाली पाटील,मुख्याध्यापक दिनेश नांदगावकर,शिक्षिका वेदिका मयेकर,तन्वी त्रिलोकेकर,यश म्हात्रे ,नीरज म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने