महेंद्र घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलियन पाहुण्यांची भेट!


महेंद्र घरत यांच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलियन पाहुण्यांची भेट!

 
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )
यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या उलवे नोड येथे साजरा होत असलेल्या नवरात्रौत्सवाला ऑस्ट्रेलिया येथील पॉल यांनी भेट दिली व नवरात्रौत्सवातील गरबा - दांडियाचा आनंद लुटला. यावेळी यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या नवरात्रोत्सव कमिटी तर्फे, परदेशी पाहुण्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. या वेळी आपल्या मनोगतात पॉल यांनी महेंद्र घरत यांच्या आंतरराष्ट्रीय कामगार क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. आयटीएफ , आयएलओ या जगातील श्रेष्ठ संघटनांवर भारतीय कामगार चळवळीचे नेतृत्व करत आपला दबदबा जागतिक पातळीवर उमटवीत आहेत. परंतु तरीही त्यांची नाळ या मातीशी जोडलेली आहे. समाजातील गोरगरिबांनी आनंद साजरा करावा म्हणून ते नवरात्रोत्सवाचे आयोजन करून जनतेला आनंद देत आहेत . तर रुग्णवाहिका, गोरगरिबांना शिक्षणासाठी मदत अनेक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे अलौकिक काम ते करीत आहेत. म्हणूनच कामगार क्षेत्रातील जागतिक नेतृत्व त्यांच्या प्रेमात आहेत आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करीत आहोत ते आमचे मित्र असल्याचा सार्थ अभिमान आहे.असे गौरवोदगार त्यांनी यावेळी काढले.यावेळी दिल्ली येथील अरविंद कौशल, मिलिंद पाडगांवकर, अखलाक श्रीलोत्री, किरीट पाटील, वैभव पाटील, अनिलशेठ घरत, गणपतशेठ घरत, मनोज फडकर आदि मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने