समाजभुषण पुरस्कार सन्मानित अमन वास्कर यांनी प्रदर्शित केला लोकनेते दि.बा.पाटील साहेबांवर लघुपट.






समाजभुषण पुरस्कार सन्मानित अमन वास्कर यांनी प्रदर्शित केला लोकनेते दि.बा.पाटील साहेबांवर लघुपट.


उरण दि २९(विठ्ठल ममताबादे )लोकनेते, माजी खासदार दि.बा.पाटील यांनी रायगड जिल्हा, नवी मुंबई मधील गोर गरीब लोकांना, शेतकऱ्यांना, कामगारांना विविध संप,आंदोलने करून न्याय मिळवून दिला.जनता त्यांना प्रेमाने लोकनेते दि.बा.पाटील साहेब म्हणून त्यांचा उल्लेख नेहमी करते.गोर गरीब, दुःखी वंचितासाठी त्यांनी केलेला त्याग जनतेसमोर यावा. त्यांच्या निस्वार्थी वृत्तीची व कार्याची ओळख जनतेला व्हावी या दृष्टीकोणातून पनेवल तालुक्यातील कुंडेवहाळ गावातील एका २१ वर्षीय तरुण अमन कैलास वास्कर यांनी शेतकरी प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि.बा पाटील साहेबांवर 'दिबा सायेब' या नावाने यूट्यूब च्या माध्यमातून लघुपट प्रदर्शित केला आहे.अतिशय सुंदर व उचित असा संदेश देणारा हा लघुपट आहे.




एका १० मिनिटाच्या व्हिडीओ मार्फत अगदी सहतेने आणि सोफ्या पद्धतीने दिबा पाटील साहेबांचे थोडक्यात कार्य जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असतील तर तुम्ही हा लघुपट नक्कीच बघा असे आवाहन अमन वास्कर यांनी केले आहे.अमन कैलास वास्कर यांनी हा लघुपट खूप अभ्यासपूर्वक केलेला दिसून येत असुन सदर लघुपटामध्ये दिबा पाटील साहेबांची मुख्य भुमिका ही नेरळ तळवडे गावातील सोपान खाडे यांनी केली आहे.त्याच बरोबर सोहम भाऊ गांगरे यांनी दिबा साहेबांची लहान पणीची भुमिका बजावली आहे



त्याच प्रमाणे चिर्ले गावातील स्वरा घरत हिने अगदी कमी वयात खुप छान भुमिका बजावली आहे. सदर लघुपटाचे लेखक व दिग्दर्शक हे अमन वास्कर आहेत. तर छायाचित्रीकरण कलुंद्रे गावातील प्रितम रमेश नारकर यांनी केले आहे.सदर लघुपटामधे नवनीत माळी, रोशन घरत, चेतन पाटील, विवेक मोकल, विश्वनाथ घरत, प्रणित भोईर, अंकेश ठाकूर, दिपेश पाटील, सौरव वास्कर, सतीश म्हात्रे, मंथन, स्वराज पाटील, रतिष केणी, दिलीप तुपे, अशोक म्हात्रे, वैशाली मोहिते, प्रीती गायकर, रोनक गायकर या सर्व कलाकारांनी मिळुन संपूर्ण जीवन प्रकल्पग्रस्त, कामगार, शेतकरी यांच्यासाठी वेचणाऱ्या दिबा पाटील साहेबांवर खुप चांगला असा समाजाला प्रेरणा देणारा लघुपट तयार केला आहे.




थोडे नवीन जरा जुने