पनवेल महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाची स्थानिक भूमिपुत्रांसाठी कारवाईची भूमिका तर परप्रांतीय विक्रेत्यांसाठी पायघड्या





पनवेल दि.१८(वार्ताहर): पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय विक्रते मोक्याच्या जागा अडवून बसले असताना त्यांच्या कारवाई करण्याचे सोडून पनवेल महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग हे वनवासी, आदिवासी माताभगिनींच्या व्यवसायावर कारवाई करताना दिसत असल्याने या अतिक्रमण विभाग विरोधात पनवेलमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 




             
शहरातील मार्केट यार्ड परिसर, शिवाजी चौक, बँक ऑफ महाराष्ट्र, आदर्श नाका , टपाल नाका, प्राचीन हॉस्पिटल परिसर, उपजिल्हा रुग्णालय परिसर, बाजापेठ, जोशी आळी आदी भागात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय विक्रेत्यांनी मोक्याच्या जागेवर घूस खोरी केली आहे. या संदर्भात वारंवार प्रसार माध्यम व सोशल मीडियाद्वारे तक्रारी करूनसुद्धा या परप्रांतीय व्यवसायिकांविरोधात अतिक्रमण विभाग कारवाई करताना दिसत नाही, तर या उलट आपले काही वनवासी बांधव व माता भगिनी जुन्या तहसील कार्यालयासमोर म्हणजेच जुन्या पोलीस स्टेशन जवळ फळे, भाजी व इतर वस्तू विकायला बसले होते.






 त्यांच्या विरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची लोकं येऊन त्यांचा माल उचलत आहेत. या संदर्भात ऍड. साखरे यांनी जाब विचारला असता त्यांनी नमते पणाचे धोरण घेतले. परंतु या पुढे अशा प्रकारे स्थानिक भूमिपुत्रांवर कारवाई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा मानस ऍड साखरे यांनी व्यक्त केला आहे.





 


थोडे नवीन जरा जुने