रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इलिट तर्फे आदिवासी कुटुंबाना धुररहित चुलीचे वाटप





पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : आज जागतिक वातावरण झपाट्याने बदलते आहे आणि ह्याला कारण पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास, कारणे अनेक आहेत आणि त्यातील एक कारण म्हणजे बेसुमार जंगलतोड, आणि जंगल भागात राहणार्‍या आदिवासींना कोणताही पर्याय नसल्याने ते अनाहूतपणे पर्यावरणाच्या र्‍हासाला हातभार लावतात.



                       हे लक्षामध्ये घेऊन रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल इलिट क्लबच्या तरुण सदस्यांनी रोट्रॅक्टर अध्यक्ष समृद्धी मुनोत यांच्या पुढाकाराने या गरीब वर्गासाठी काहीतरी करावे म्हणून एक संकल्प सोडला आणि यासाठी पैसे जमा करण्यासाठी त्यांनी दांडिया समारंभाचे आयोजन केले आणि त्यातून त्यांनी जवळजवळ 35 हजार रुपये जमा करून या प्रोजेक्टसाठी वापरायचे ठरवले आणि त्यांना धूर रहित चूल देण्याचा संकल्प केला त्याचा एक भाग म्हणून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दहा गरीब आदिवासी कुटुंबांना ही धूर रहित चूल देण्याचा कार्यक्रम पेण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात शिंदळाची वाडी ( वरवणे) येथे संपन्न झाला तसेच तेथील मुलांना खाऊचे वाटप देखील केले.यावेळी रोटरीयन रितेश मुनोत आणि आणि त्यांच्या पत्नी मीनल मुनोत यांनी त्या आदिवासी लाभार्थींना ही चूल त्यांच्यासाठी कशी उपयोगी आहे आणि त्यामुळे त्यांच्या जीवनावर आणि आरोग्यावर याचा कसा चांगला परिणाम होईल हे विशद केले



. या चुलीचे वैशिष्ट्य म्हणजे या चुलीला मोठी लाकडं असण्याची अजिबात गरज नसते अगदी जंगलात पडलेल्या झाडाच्या काटक्या वापरून देखील याच्यावर स्वयंपाकाचा वेळ निम्म्याने कमी करता येतो हे त्यांनी समजावून सांगितले.याप्रसंगी रोट्रॅक्टर वंशी देडिया व प्रिशा मेहता या उपस्थित होत्या. हा प्रकल्प गरीब लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सुरेंद्र व्यवहारे व शाळेचे मुख्याध्यापक दहिफळे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी या भागात अजून भरपूर गरीब कुटुंबे आहेत त्यांच्यापर्यंत देखील ही मदत जावी असे मनोगत व्यक्त केले गेले. 



थोडे नवीन जरा जुने