पनवेल दि, ०९ (वार्ताहर) : भरधाव दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी पायी जाणाऱ्या तरुणाच्या हातातील मोबाईल खेचून पलायन केल्याची घटना खारघरमध्ये घडली आहे.
खारघर पोलिसांनी या लुटारूविरोधात जबरी चोरीचा इन्हा दाखल केला आहे. खारघर से- ३५ मध्ये राहणारा निकेत खत्री (२७) हा मुंबईतील लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तो भावाला भेटण्यासाठी तळोजा येथे गेला होता. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शेट पापा चौकातून पायी चालत जात असताना, पाठीमागून स्कुटीवरून आलेल्या दोघा लुटारूंपैकी एकाने निकेतच्या हातातील मोबाईल खेचून खुटुकबांधणच्या दिशने पळ काढला. यावेळी निकेतने लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत लुटारू पळून गेले. या प्रकारानंतर निकेतने खारघर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
Tags
पनवेल