पनवेल तालुक्यातील देवीचा पाडा येथील रहिवाशी दिपाली रामचंद्र पाटील यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्कार करताना युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, माजी सरपंच राम पाटील, युवा मोर्चा प्रभाग २ अध्यक्ष शुभम खानावकर, आकाश फडके, करण फडके, तसेच दिपाली पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील.
Tags
पनवेल