उलवे मधील विविध प्रश्न मार्गी लागणार"प्रितम म्हात्रेंनी घेतली सह-व्यवस्थापकीय संचालकांची भेट"


    सिडकोच्या माध्यमातून उलवे येथे नवीन वसाहत गेल्या काही वर्षापासून वसवली गेली आहे परंतु अजूनही येथे सेवा आणि सुविधा या पूर्णपणे नागरिकांसाठी उपलब्ध नाहीत. त्यांपैकी काही ठराविक विषयात लक्ष देणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने गेल्या अनेक महिन्यांपासून शेकाप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे विविध सिडकोच्या विभागांमध्ये पाठपुरावा करत होते. या विषयांना मार्गी लावण्यासाठी दिनांक 26 जुलै 2024 रोजी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक  श्री.गणेश देशमुख यांच्या दालनात शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी आणि उलवे मधील विविध संघटनांचे सभासद यांची बैठक पार पडली. 

            त्यात मुख्यत्वे करून  फेरीवाले आणि अपंग यांच्यासाठी जे आरक्षित भूखंड आहेत ते विकसित करणे आणि मार्केट साठी जागा उपलब्ध करून देणे जेणेकरून स्थानिकांना त्याचा लाभ होईल जेणेकरून अतिक्रमण विरोधी कारवाईच्या वेळी जो त्रास स्थानिक छोट्या व्यापाऱ्यांना होत होता तो विषय भविष्यात कायम निकाल निघेल. शीख बांधवांसाठी एकही गुरुद्वारा नसल्याने त्याकरिता सिडकोच्या नियमानुसार  सेक्टर 23 येथे गुरुद्वारा साठी प्लॉट उपलब्ध करून देण्यासाठी शिख बांधवांचे प्रतिनिधी यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. नव्याने निर्माण होत असलेल्या वस्तीमध्ये तरुण पिढीवर  छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्याचा प्रसार होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यानुसार लवकरच या विषयात सकारात्मक पाऊले सिडकोच्या माध्यमातून आम्ही घेऊ असे श्री गणेश देशमुख यांनी सांगितले.
       नागरिकांना आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये अपुऱ्या सुविधा आहेत. नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता सेक्टर 8 येथे आरोग्य सेवेसाठी आरक्षित भूखंड क्रमांक 40 आहे त्या ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यात यावे जेणेकरून परिसरातील सर्वसामान्य नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतील अशी मागणी त्यांनी केली.


     ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या करिता उलवे येथील सेक्टर 17 प्लॉट नंबर 130 या ठिकाणी गार्डन चे काम अपूर्ण अवस्थेत आहे ते त्वरित पूर्ण करून त्याचे लोकार्पण करावे जेणेकरून त्याचा लाभ नागरिकांना मिळेल असे त्यांनी सांगितले.
        रायगड आणि नवी मुंबई परिसरातील तरुणांसाठी  एमपीएससी, यूपीएससी, विमानतळ या संदर्भातील भरती प्रक्रिया संदर्भात अभ्यासासाठी एक मोठी लायब्ररी उलवे मध्ये उभारण्यात यावी जेणेकरून आपल्याच विभागातील मुलं विविध मोठ्या पदांवरती जातील .

      भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नवीन पिढीला मिळावे याकरिता सेक्टर 15 मध्ये बौध्द विहार उभारावे ज्या मधून बाबासाहेबांनी जे विचार दिले आहेत ते  अंगीकारून तरुण पिढीला एक वेगळी दिशा मिळेल.
        भारतीय डाक विभागाचे कार्यालय उलवे येथे नाही त्या विभागातील कामाकरिता  नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासंदर्भात पोस्ट ऑफिस मध्ये पत्रव्यवहार केला असता सिडकोकडून भूखंडा संदर्भात सहकार्य झाले तर उलवेकरांना सेवेत पोस्ट ऑफिस सुरू होईल. यासाठीच  सेक्टर 8 या ठिकाणी भूखंड क्रमांक 54 हा राखीव आहे त्या ठिकाणी नवीन पोस्ट ऑफिस उभारावे अशी मागणी त्यांनी केली.
     खारकोपर आणि बामण  डोंगरी रेल्वे स्टेशन येथील एस्केलेटर (स्वयंचलित जिने) बसवण्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक आणि महिलांना रेल्वे स्टेशन  प्रवासादरम्यान त्रास होतो.  एस्केलेटर बसवण्यासाठी कंत्रादाराची नेमणूक झाली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व वस्तू स्थानकामध्ये गेले कित्येक महिने येऊन पडल्या आहेत परंतु त्या बसवणे संदर्भात योग्य कार्यवाही कंत्राटदाराकडून केलेली दिसून येत नाही याबद्दल त्यांनी तक्रार केली.


थोडे नवीन जरा जुने