स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या पक्षाच्या खारघर आणि कामोठे येथील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक खारघर येथे घेतली . या बैठकीला सुनील कुमार ,श्यामलाल घारू ,अजित खेरवाल व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
त्याचबरोबर आज संध्याकाळी मुंबई येथील मुख्य कार्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाकरिता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे उपस्थित राहणार आहेत. महेश साळुंखे हे उरण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारासाठी जिथे तिथे सभा घेतल्या जात आहेत त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्याचप्रमाणे बाळाराम पाटील यांच्या सोबत सुद्धा ते पनवेल मध्ये प्रचार दौऱ्यासाठी फिरत आहेत.
Tags
खारघर